जाणून घ्या बॅालिवूड सेलिब्रिटींची तुम्हाला माहित नसलेली आडनावं, ‘रेखाचे’ आणि ‘शानचे’ आडनाव वाचून आश्चर्य वाटेल…

मायानगरीमध्ये आपले नशीब उजळवण्यासाठी बॉलीवूडमधील कलाकार निरनिराळे फंडे वापरताना दिसून येतात. काहीजण न्युमरॉेलॉजीच्या आधारे आपल्या नावांचे स्पेलिंग बदलताना दिसून येतात तर काहीजण चक्क आपले आडनावच लावत नसल्याचीही उदाहरणेही आहेत.आपले खरे आडनाव सिनेसृष्टी व चाहत्यांपासून राखून ठेवण्यामध्ये काही आघाडीच्या कलाकारांचाही सामावेश आहे ज्यांची नावे वाचून निश्चितच आपल्याला धक्का बसेल.

अगदी अल्पावधीत तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या रणवीर सिंगचे खरे आडनाव ‘रणवीर सिंग भवनानी’ आहे. त्याने मात्र रणवीर सिंग याच नावाने आपली ओळख निर्माण केली आहे. चिरतारूण्याचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या रेखा यांचेही खरे नाव ‘भानुरेखा गणेशन’ आहे. आपल्या आवाजातील माधुर्यासाठी प्रसिद्ध असलेले पार्श्वगायक शान हेसुद्धा त्यांच्या ‘शान मुखर्जी’ या नावाऐवजी शान या नावानेच परिचित आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीला कँब्रे या नृत्यप्रकाराच्या रूपात ग्लँमरच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणा-या हेलन यांचे संपूर्ण नाव ‘हेलन अँन रिचर्डसन’ आहे.गजनी आणि रेडी यांसारख्या मोजक्याच चित्रपटांमधून झळकलेल्या मात्र तरीही दखलपात्र ठरलेल्या असीन या दाक्षिणात्य अभिनेत्रीचे मूळ नाव ‘असिन थोटुमकल’ आहे. आपल्या बोलक्या डोळ्यांमधून अभिनय जिवंत करणा-या काजोलचे खरे आडनाव मुखर्जी होते मात्र आईवडिलांच्या घटस्फोटानंतर तिने आडनाव लावणे बंंद केले.

आपल्या नृत्यकौशल्य आणि अभिनयाने तब्बल तीन दशकं सिनेसृष्टीत आघाडीवर असलेल्या व चीची या नावाने ओळखले जाणा-या गोविंदा यांचे खरे नाव गोविंद अरूण आहुजा’ आहे मात्र न्युमरॉेलॉजीनुसार त्यांनी बदल करून आपले नाव गोविंदा असे केले. ‘चांदनी’ या तूफान गाजलेल्या भूमिकेने ओळखल्या जाणा-या श्री देवी यांचे खरे नाव ‘श्री अम्मा यांगरी अय्यपन’ असं आहे. बॉलीवुडचा मिस्टर खिलाडी म्हणून ओळखल्या जाणा-या अक्षय कुमारचे नाव राजीव हरी ओम भाटिया आहे. आपले खरे आडनाव न लावणा-या या कलाकारांनी अभिनयाच्या बाबत मात्र नेहमीच आपण खणखणीत नाणे असल्याचेदाखवून दिले आहे.

Comments